सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या स्वयंदीप प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक

यावल , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथे लाईफ इज ब्युटीफुल फाउंडेशन आयोजित, मल्हार हेल्प फेअर -४ या सामाजिक क्षेत्रात विविध प्रकारच्या समाजहिताचे कार्य करणाऱ्या ६० समाजसेवी संस्था व २६ सेवामहर्षी सहभागी झाल्या आहेत. या सेवा कुंभमेळयात डांभुर्णी येथील स्वयंदीप प्रतिष्ठान सहभाग घेतला असून त्यांच्या स्टॉलने मान्यवरांचे लक्ष वेधले आहे.

 

स्वयंदीपच्या मल्हार हेल्प फेअर -४ मधील स्टॉलला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यात प्रामुख्याने जॉइंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स मुंबई उज्वल कुमार चव्हाण ,जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, सविता भोळे मॅडम , रजत भोळे, माझे सन्मित्र नोबेल फाउंडेशनचे जयदीप दादा, गुरुवर्य के. एन. पाटील सर, स्वराज्य ग्रुपचे अण्णासाहेब शंभू सोनवणे तसेच सुपरकॉप चंद्रशेखर देसले ,विवेकानंद प्रतिष्ठान निवासी प्रकल्पाचे प्रमुख शशिकांत पाटील यांचा समावेश आहे. स्वयंदीप अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना स्वयंदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन विक्रम सोनवणे तसेच युवा कार्यकर्ता सूर्यतेजस पाटील आदी मान्यवर मंडळी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

Protected Content