कोरोनामुळे पदसिद्ध महास्वामी महाराजांचा स्मृती महोत्सव रद्द

पहूर, ता.जामनेर रविंद्र लाठे | बुलढाणा जिल्ह्य़ातील साखरखेर्डा येथील पदसिद्ध महास्वामी यांचा ९६२ वा स्मृती महोत्सव कोरोनाच्या संसर्गामुळे रद्द करण्यात आला आहे. भाविकांच्या सोईसाठी पदसिद्ध संस्थान या वेबसाईटवर ऑनलाइन महापूजा व आरतीचे प्रसारण करण्यात येणार आहे.

दरवर्षी श्रावण महिन्यातील चतुर्थी ला पदसिद्ध मठात पदसिद्ध महास्वामी महाराजांचा स्मृती महोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी ६, ७ व ८ ऑगस्ट ला साजरा होणारा हा 962 वा स्मृती महोत्सव कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. या स्मृती महोत्सवास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो वीरशैव लिंगायत सांप्रदायिक भाविक सहभागी होतात. भाविकांना ऑनलाइन महापूजा अनुभवता येणार असल्याची माहिती संस्थानचे उत्तराधिकारी नीळकंठ स्वामी यांनी लाईव्ह ट्रेन्डस न्युज शी बोलताना दिली.

शेकडो दिंड्यांचे आगमन आणि गावातील पालखी सोहळ्याने भक्तांचा महापूर पहावयास मिळतो. यावर्षी पदसिद्ध महास्वामी यांची महापूजा आणि आरती ऑनलाईन बघता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा रद्द करण्यात आल्याने अनेक वर्षांपासून ची परंपरा खंडित होणार आहे. पदसिद्ध महास्वामी यांची महापूजा मठाधिपती. सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते आणि मठाचे उत्तराधिकारी नीळकंठ स्वामी व सोमनाथ स्वामी यांच्या मंत्रोच्चारात होणार आहे.

Protected Content