सुशांतच्या बँक खात्यात जमा झालेले ५० कोटी काढले गेले, हा तपासासाठी महत्त्वपूर्ण विषय नाही का?

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या चार वर्षांत सुशांतच्या बँक खात्यात जमा झालेले सर्व ५० कोटी रुपये खात्यातून काढले गेले. एका वर्षात १७ कोटी रुपये त्याच्या खात्यात जमा केले गेले. त्यापैकी १५ कोटी रुपये काढले गेले. हा तपासासाठी महत्त्वपूर्ण विषय नाही का? आम्ही शांत बसणार नाही. आम्ही मुंबई पोलिसांना याबद्दल प्रश्न विचारणार’, असे बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय यांनी सांगितले आहे.

 

माध्यमांशी बोलताना पांडेय म्हणाले, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिस आर्थिक दृष्टीकोनातून तपास करत नाहीय. गेल्या चार वर्षांत सुशांतच्या बँक खात्यातून तब्बल ५० कोटी रुपये काढले गेले आणि फक्त गेल्या वर्षभरात १५ कोटी रुपये काढण्यात आले आहेत. दरम्यान, २५ जुलै रोजी सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरूद्ध त्यांच्या मुलाची फसवणूक करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यांनी आरोप लावला आहे की, सुशांतच्या बँक खात्यातून रिया आणि तिच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात सुशांतच्या बँकेतून १५ कोटी रुपये वर्ग झाले आहेत. दुश्रीअकडे रविवारी पाटण्यातील एसपी विनय तिवारी हे विमानाने मुंबईत दाखल झाले. मात्र कोरोना नियमांचा हवाला देत बीएमसीने त्यांना १५ ऑगस्टपर्यंत क्वारंटाइन केले आहे.

Protected Content