आमदार भोळे “मामाचं”आंदोलन म्हणजे दुर्दैवी जळगावकरांची थट्टा — देवेंद्र मराठे

 

 

जळगाव : प्रतिनिधी । पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ आमदार राजूमामा भोळे यांच्या पुढाकाराने शहरात आज करण्यात आलेले आंदोलन म्हणजे जळगावकरांची थट्टाच होती अशी टीका एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे

 

आज भाजपाचे जिल्हाध्यक्ष व दुर्दैवी जळगावकरांचे आमदार राजूमामा भोळे यांनी भाजप नेत्यांना खुष करण्याकरता शहराच्या चौकामध्ये कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत (नियम केवळ सर्व सामान्यांसाठीचं का..?  आमदारांसाठी नाही का..?  पोलिस प्रशासनाने उत्तर द्यावे) पश्चिम बंगालमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी तेथील तृणमूल काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन  केले .

 

मामांचं हे आंदोलन दुर्दैवी जळगावकरांची  थट्टाच म्हटल्या जाईल  कारण  जिल्ह्यात व शहरामध्ये कोरोना ने गेल्या मार्च पासून  थैमान घातलेले आहे.  प्रतिदिन दीड हजाराच्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह होत होते.  शहरांमधील सामान्य रुग्णालय व खाजगी रुग्णालय अपुरी पडत होती.  रुग्णालयांमध्ये जळगावकरांना बेड उपलब्ध होणे कठीण झाले होते. रुग्णालयामध्ये लाखो रुपये डिपॉझिट केल्यानंतर बेड  उपलब्ध झाला, तरी रूग्णालयामध्ये ऑक्‍सिजनचा अभाव होता.

इतकी भयावह परिस्थिती  जळगावकरांची  असताना  नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने आमदार म्हणून निवडून दिलेले राजू मामा भोळे मात्र कोरोनासारख्या या महामारी मध्ये जळगावकरांना वार्‍यावर सोडून घरांमध्ये लपून बसलेले होते.

आमदार महोदयांनी आमदार म्हणून शहराची संपूर्ण जबाबदारी झटकून टाकलेली होती.  त्यांनी शहरामधील नागरिकांची कोरोणाशी सुरू असलेली झुंज व होत असलेले हाल यावर फक्त बघ्याची भूमिका घेतली.

 

शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी शहरांमध्ये मोठे कोवीड सेंटर का उभारले नाही..? आमदार म्हणून राजूमामा भोळे यांनी जळगाव शहरातील नागरिकांसाठी मोफत कोवीड रुग्णालय का सुरू नाही केले..? उलट मोफत कोवीड रूग्णालयाऐवजी खाजगी रुग्णालय (मातोश्री या नावाने भागिदारीने ) का सुरु केले..? परंतु ज्या पद्धतीने मामांना शहराचा कारभार चालवता आला नाही, त्याच पद्धतीने त्यांना पैसे कमविण्याकरता सुरु केलेल्या खाजगी रुग्णालयाचा ( मातोश्री) कारभार देखील चालविता आला नाही व त्या रुग्णालयांमधूनदेखील त्यांनी काढता पाय काही दिवसांमध्येच घेतला.असेही देवेंद्र मराठे म्हणाले

 

ज्या पद्धतीने आमदार महोदयांनी चौकाचौकात दारूची दुकाने उघडली त्या पद्धतीने किमान शहरात  आमदार म्हणून  कधीच सामान्य रुग्णालयामध्ये जाऊन तेथील कोरोना बाधित रुग्णांची चौकशी का केलेली नाही ?   शहरातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची  मोठ्या प्रमाणामध्ये अव्वाच्या सव्वा बिले काढून मोठ्या प्रमाणात लूट केली गेली परंतु आमदारानी एकाही कोरोना रुग्णाचे एक रुपयाही बिल कुठल्याही रुग्णालयात जाऊन कमी करून दिले नाही अशी टीकाही मराठे यांनी केली .

 

राज्य सरकारने लोकडाऊन जाहीर केला. या लॉकडाउनच्या काळामध्ये हातावर पोट भरणाऱ्या अनेक लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आमदार म्हणून राजूमामा भोळे यांनी या हातावर पोट असणाऱ्या किती शहरातील लोकांना त्यांच्या आमदार निधीमधून मदत केली..? याचा त्यांनी जाहीर खुलासा करावा..

याउलट पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभवाची नामुष्कीला सामोरे जावे लागले व त्याच्याच व्देशापोटी राष्ट्रीय पातळीवरून देशातील सर्व भाजप नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना एक राष्ट्रीय कार्यक्रम देण्यात आला. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ शहरा- शहरांमध्ये आंदोलन करायचे त्या अनुषंगानेच आज कधीही व कुठेही कोरोनासारख्या महामारीत  न दिसलेले .. कुठल्याही कोवीड रुग्णालयांमध्ये कुठल्याही कोरोना बाधित रुग्णाची चौकशी करण्याकरता न गेलेले  आमदार राजूमामा भोळे हे मात्र अचानक  प्रकट झाले   जळगावकरांची योग्य ती जबाबदारी आमदार म्हणून पार पाडली असती तर त्यांच्या आंदोलनाला कुठलाही विरोध एनएसयूआयने केला नसता त्यामुळेच त्यांच्या या आंदोलनाला दुर्दैवी जळगावकरांची थट्टा असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे मराठे यांचे म्हणणे आहे ..

Protected Content