लागल्यास पुन्हा गुवाहाटीला जाऊ ! : बच्चू कडूंचा थेट इशारा

मुंबई लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेले बच्चू कडू यांनी आज सरकारला घरचा आहेर देत घणाघाती टीका केली.

बच्चू कडू यांनी आज सकाळी मंत्रीपदाबाबत थोडी सामोपचाराची भाषा केली होती. मात्र त्यांनी सभागृहात सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते  म्हणाले की, शेतकर्‍यांचे प्रश्न तेच आहेत. सत्ता बदलली की, चेहरे बदलतात. आमचे धोरणे चुकीचे होते. स्वामीनाथ आयोग लागू केला असता तर शेतकरी आत्महत्या ५० टक्क्यांनी कमी झाल्या असत्या. मी कोणत्या पक्षाचा हे महत्त्वाचं नाही. भाजप-शिवसेनाला पाठिंबा दिला म्हणजे मी शेपटी हालवायची हा विषय नाही. तुम्ही आम्ही शेतकर्‍यांना कसायासारखे कापतो. आम्ही सगळेच नालायक आहोत. आम्ही जखमेवर मीठ टाकणार्‍यांची औलाद आहोत, असं म्हणत पावसाचं नाव बदनाम करतोय, अशी टीका त्यांनी केली.

बच्चू कडू पुढे म्हणाले की, मी शेतकर्‍यांच्या बाजुने बोलू की नको. मी बोललो तर माझा राग होईल. मला परवा नाही. चुलीत घाला ते मंत्रीपद. झेंडा घेऊन थोडीच निवडून आलो. माझी स्वत:ची पानटपरी असल्याचा टोला त्यांनी लगावला. विधवा भगिनी असो वा अपंग बांधव यांना रोजगार हमी योजनेत आणण्याचा निर्णय घ्या. वाटलस पुन्हा एकदा गुवाहाटीला जावू. लावा छातीला माती, असंही कडू यांनी म्हटलं. शिंदे सरकारमधील त्यांच्या सहकारी आमदारांमुळे गुवाहाटीची ख्याती झाली असतांना आता बच्चू कडू यांनी पुन्हा गुवाहाटीला जाण्याचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Protected Content