मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एनसीएससी कार्डचं लोकार्पण

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बस, लोकल आणि मेट्रोसाठी मुंबईकरांना आता वेगवेगळे कार्ड काढण्याची आता आवश्यकता नाही तर या तिन्ही वाहतुकींसाठी एकच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएससी कार्ड) जारी करण्यात आलं असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज याचेच लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थिती होती.

याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, ” आज बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे उद्घाटन होत आहे. आपण मुंबईकर असल्याने येथील परिवहन सेवेतून आपला प्रवास झाला असून शाळेत जाण्या, येण्यासाठी बसमधून प्रवास झाला आहे. मात्र आता काळ बदलला असून आता बसच्या प्रवासात अनेक बदल झाले आहेत. आयुष्याच्या प्रवासात कितीही थांबे आले तरी पुढे चालत राहायचं.” यावेळी त्यानी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

Protected Content