दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी येथील माहेर असलेल्या विवाहितेचा दोन लाख रुपयांसाठी छळ करणाऱ्या पतीसह चार जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील खेडी येथील माहेर असलेल्या आरती साळुंखे वय २३ यांचा जळगाव तालुक्यातीलच आव्हाणे येथील विक्की उर्फ विकास सुपडू साळुंखे यांच्यासोबत झाला आहे.

लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर आरती यांना त्यांचे पती विक्की साळुंखे यांनी कामधंद्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावेत अशी मागणी केली. याच कारणावरुन पतीसह सासरच्या इतरांनी आरती यांचा शिवीगाळ तसेच मारहाण करुन मानसिक छळ व शारिरीक छळ केला.

आरती साळुंखे यांनी दिलेल्या अशा तक्रारीवरुन रविवारी पती विक्की साळुंखे, सासू लताबाई साळुंखे, नणंद करुणा सोनवणे, आजल सासू केवयबाई सोनवणे सर्व रा.आव्हाणे. ता. जळगाव यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील सोनार हे करीत आहेत.

Protected Content