खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त शहरातून भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली.
संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७३ वा समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त १४ व १५ जुलै रोजी स्थानिक गोपाळ नगर येथील संत नामदेव महाराज मंदिर भवन येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शनिवारी सायंकाळी शहरातून टाळ मृदंगाच्या गजरात भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली.
या पालखी सोहळ्यात आमदार आकाश फुंडकर हेसुद्धा सहभागी झाले. आमदार फुंडकरांनी पालखीतील संत नामदेव महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सहभागी वारकरी बांधवांचा आशीर्वाद घेतला.
याप्रसंगी संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारक समितीचे विश्वस्त राजूभाऊ आगरकर ,शिवाजी धिरडे, वैभव ईश्वरे,विजय दिवसे, आकाश बडासे, गौरव दिवसे, चेतन गोडाळे ,सुभाष देवगिरीकर,संतोष मुळंतकर ,योगिता देवगिरीकर ,जगदेव गोडाळे ,शुभांगी गोरले ,राकेश सुतवणे ,योगेश ईश्वरे ,गौरव जोध ,विजय वरूडकर,सचिन बंड,अभिषेक ईश्वरे, निलेश देवगिरीकर,शाम गोरले,विजय दिवसे,प्रशांत काठोके,शुभांगी गोरले आदींसह शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.