उपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली श्री विठ्ठल पूजा

पंढरपूर । कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक महापूजा संपन्न झाली. याप्रसंगी महापूजेचा मान वर्धा जिल्ह्यातील भोयर दाम्पत्याला मिळाला.

श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.कोरोनाचे सावट असल्याने अतिशय कमी मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाची कार्तिकी एकादशीची महापूजा पार पडली. पहाटे अडीच वाजता पूजेला सुरुवात झाल्यानंतर ३.३० वाजण्याच्या सुमारास विठ्ठलाच्या लाईव्ह दर्शनासह महापूजेचा हा सोहळा पार पडला. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांनी पूजा केली. तर, श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या मानाच्या वारकरी दाम्पत्याचा मान कवडुजी नारायण भोयर ( वय ६४) व कुसुमबाई कवडूजी भोयर ( वय ५५ रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) यांना मिळाला. उपमुख्यमंत्र्यांसमेवत या दाम्पत्यानेही श्री विठ्ठलाची महापूजा केली.

२५ ते दि.२७ नोव्हेंबर या कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात पहारा देणार्‍या एकूण ६ विणेकांपैकी पांडूरंग (ईश्‍वर) चिट्टीने श्री.कवडुजी नारायण भोयर (वय ६४, रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) यांची निवड करण्यात आली होती.

Protected Content