आमदार अपात्रता प्रकरणी १० जानेवारी पर्यंत निकाल द्या : कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी आता १० जानेवारी पर्यंत निर्णय देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आधी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३१ डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी सुनावणी घेऊन अंतिम निर्णय जाहीर करण्याचे आदेश दिले होते. यामुळे ३१ डिसेंबरच्या आधीच निकाल येणार असल्याचे संकेत मिळाले होते. आज मात्र सुप्रीम कोर्टाने नव्याने निर्देश दिले आहेत.

विधानसभा अध्यक्षांनी सलग काही आठवडे सुनावणी घेतली. शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांची उलटसाक्ष नोंदवण्यात आली. दरम्यान ३१ डिसेंबरपर्यंत निकाल जाहीर करणं शक्य नसल्याची भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची होती. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यांच्या या मागणीवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने राहुल नार्वेकर यांना सुनाणीसाठी १० जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.

Protected Content