महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचे निधन

ब्युनोस आयर्स वृत्तसंस्था । सर्वकालीन महान फुटबॉलपटूंमध्ये गणना होणारे महान खेळाडू डिएगो मॅराडोना यांचे निधन झाले आहे.

अर्जेंटिनाचे माजी दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. मॅराडोना यांनी अर्जेंटिना संघाकडून ३४ गोल करताना ९१ गोल करण्यात सहकार्य केले आहे. तसेच त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये विविध संघांकडून खेळताना एकूण २५९ गोल केले.

१९८६ साली अर्जेंटिनाने मिळवलेल्या विश्‍वविजेतेपदामध्ये मॅराडोना यांचे मोलाचे योगदान राहिले होते. याच स्पर्धेत त्यांनी निर्णायक असा हँड ऑफ गॉड गोल केला होता. मॅराडोनाने बोका ज्युनियर्स, नपोली आणि बार्सिलोनासाठी क्लब फुटबॉल खेळला आहे. ड्रग्ज आणि दारूच्या व्यसनामुळे ते अनेकदा वादातही राहिले होते

३० ऑक्टोबर रोजी माराडोना यांनी आपला ६० वा वाढदिवस साजरा केला. ड्रग्ज आणि दारूच्या आहारी गेल्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात आलं होतं. जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये गणना होत असलेल्या मॅराडोना यांच्या निधनाने फुटबॉल विश्‍वावर शोककळा पसरली आहे.

Protected Content