भाजपमधील अनेक नेते संपर्कात पण. . .: खडसे काय म्हणाले ?

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानपरिषद निवडणुकीसाठी काही तास उरले असतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपचे अनेक नेते संपर्कात असले तरी कुणी मतदानाचे आश्‍वासन दिले नसल्याचे म्हटले आहे.

 

विधानपरिषद निवडणुकीची चुरस शिगेला पोहचली आहे. यातील दहावी जागा ही अतिशय चुरशीची लढली जाणार असून यात कुणाला काय फटका बसेल हे आजच सांगता येणार नाही. या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथराव खडसे यांनी बविआचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.

 

यानंतर  प्रसारमाध्यमांशी बोलतांना भाजपचे नेते संपर्कात असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, मी अनेक वर्षे भाजपमध्ये असल्याने बर्‍याच नेत्यांशी संपर्क असणे स्वाभाविक आहे. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर बर्‍याच जणांशी संपर्क झाला असला तरी कुणी मतदानाबाबत चर्चा केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, त्यांनी आमदार ठाकूर यांच्याशी झालेल्या भेटीचा तपशील जाहीर केला नसला तरी मतांच्या बेगमीसाठी त्यांचे प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!