पालकमंत्र्यांच्या हस्ते यावलमध्ये रस्ते विकास कामांचे भुमीपुजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आलेल्या यावल शहरातील सुमारे दोन कोटी रूपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपुजन त्यांच्याच हस्ते करण्यात आले.

(Image Credit Source: Live Trends News)

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते शहरात विकासकामांचे भूमिपुजन करण्यात आले. यामध्ये यावल शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील विरारनगर , ओम नगर पासुन तर भुसावळ रोड पर्यंत , भुसावळ रोड ते आयशानगर मधील रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे , शहरातील फैजपुर रोडवरील श्रीराम ऑटो पासुन तर तडवी कॉलनी पर्यंत अशा सुमारे दोन कोटी रुपयांच्या कामांचा समावेश होता. भुमिपुजन कार्यक्रमानंतर श्री गजानन महाराज मंदीरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, खोक्यांचे राजकारण करणार्‍या करू द्या आपला मतदार राजा हा जागृत असुन आपल्या कार्याचे उत्तर तो मतदानातुन देईल. राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या शासनाने एका वर्षात केलेले विकासकामे व जनहिताचे क्रांतीकारक निर्णय राज्यातील सर्वसामान्या पर्यंत पहोचवा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

या कार्यक्रमास शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील , भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, माजी सभापती रवींद्र पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, डॉ कुंदन फेगडे, विलास चौधरी, कृउबाचे संचालक उज्जैनसिंग राजपुत , भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे यांच्यासह आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते .यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना भरत चौधरी केली तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार भाजपाचे विलास चौधरी यांनी मानले.

Protected Content