सरकारकडून सचिनच्या सुरक्षेत कपात; आदित्य ठाकरेंना ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा

sachin

 

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्रात 97 व्हीआयपींना सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येते. यापैकी 29 व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेत बदल करण्यात आला आहे. यामध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याची ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या ‘वाय प्लस’ सुरक्षेत वाढ करत त्यांना ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून नुकतेच राज्यातील ४५ महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत बदल करण्यात आले. एका आयपीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सचिन तेंडुलकरला याआधी एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती. म्हणजेच सचिनसोबत चोवीस तास पोलीस कॉन्स्टेबल असायचा. पण आता अशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे. यापुढे सचिनला पोलिस एस्कॉर्ट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना असलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा कमी करुन ‘एक्स’ दर्जाची करण्यात आली आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याही सुरक्षेत घट करण्यात आली आहे. निकम यांना असलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था ‘वाय’ दर्जाची करण्यात आलीय. तर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करून ती ‘वाय प्लस’वरुन ‘झेड’ दर्जाची करण्यात आली आहे.

Protected Content