फैजपूरात ओबीसी मोर्चातर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त शहरातील श्रीराम मंदिर आठवडे बाजारपेठ येथे ऋण निर्देश कार्यक्रम भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने घेण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेंगडे होते.

भारतरत्न सदरदार वल्लभभाई पटेल यांच्या तैलचित्राला उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून माल्यार्पण करून अखंड भारताच्या एकात्मकतासाठी व सोरटी सोमनाथ मंदिर जिर्णोद्धार कार्याबाबी त्यांच्या प्रतिऋण निर्देश व्यक्त करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सरदार पटेल यांच्या जीवन कार्याला विशेष महत्त्व देत युनिटी ऑफ टँचू सरदार पटेलांचा भव्यदिव्य पुतळा, राष्ट्रीय एकात्मता दिन – मानवसाखळी, व विविध व्यक्तिगत लाभार्थी योजना ( उज्वला गॅस,घरकुल योजना, जनधन खाते,पी एम किसान योजना आदी योजना ) लाभार्थी यांनी पंतप्रधान मोदींना लिहलेली आभार पत्रे व पदवीधर मतदार फॉर्म भाजपा पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

कार्यक्रम प्रास्ताविक व आभार निलेश कोल्हे तर सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी केले. सदर उपक्रमला ओबीसी प्रदेश सचिव भाजपचे पंस सभापती भरत महाजन, तालुकाध्यक्ष उमेश पाटील, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैन राजपूत, हंबर्डी माजी सरपंच किशोर पाटील, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष निलेश कोल्हे, शहराध्यक्ष अनंत नेहेते, सरचिटणीस संजय सराफ, जिल्हा शिक्षक आघाडी सदस्य राजेश महाजन, ओबीसी शाखाध्यक्ष अनुराधा परदेशी, भारती पाटील, उल्हास वाघूळदे, अतुल महाजन, राजाभाऊ चौधरी, हरचंद वाघूलदे, गोकुळ बाक्षे, भाजप व ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content