सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतरत्न लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शास्त्री टॉवर चौक ते महापालिका दरम्यान भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव नियोजन समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा ढोल ताशांच्या गजरात सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास काढण्यात आली.

 

आयोजित केलेल्या शोभायात्रेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन परिचयावर सजीव आरास, सोरठी सोमनाथ मंदिर गुजरात प्रतिकृती, कालिंका माता मंदिर पावागड प्रतिकृती, सौराष्ट्र ते खान्देश मध्ये आलेल्या गाड्यांचे प्रतिकात्मक देखावा, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचेवर आधारित जीवन चरित्र, बर्डोली सत्याग्रह माहिती, ५६५ संस्थानांचे अखंड भारतात विलीनीकरण, जुनागड-हैदराबाद संस्थेचे अखंड भारतात विलीनीकरण देखावा, वारकरी संप्रदाय विठ्ठल रुक्माई देखावा, प्रगतशील शेतकरी देखावा, लेझीम पथक, गुरव वाद्य, संस्कृतीक ढोल ताशा पथक, वारकरी पायी दिंडी असे नियोजन करण्यात आले होते.  तसेच समाज प्रबोधनावर व्याख्यानमाला घेण्यात आली. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, सुनिल महाजन, ललित कोल्हे, विष्णू भंगाळे, सुनिल भंगाळे, पिंटू काळे, कुंदन काळे, अजित राणे, चंदन कोल्हे यांच्यासह आदींनी शोभायात्रेत सहभाग नोदविला होता.  सदरील शोभायात्रा  शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नेहरू चौक, भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल टॉवर शहर महानगरपालिका येथे समारोप करण्यात आला.

Protected Content