एक लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी ।   माहेरुन एक लाख रुपये व एक तोळ्याची सोन्याची अंगठी आणावी यासाठी नशिराबाद येथील माहेर असलेल्या विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या पतीसह पाच जणांवर नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, जागृती प्रशांत रोटे (वय-२४) रा.  नशिराबाद ता. जळगाव ह्याचा विवाह गावातीलच प्रशांत गुणवत रोटे यांच्याशी २०१६ मध्ये विवाह झाला. सुरूवातीचे काही दिवस पतीसह सासरच्या मंडळींनी वागणूक चांगली दिली. त्यानंतर पती प्रशांत रोटे याने माहेरहून १ लाख रूपये आणि एक तोळ्याची सोन्याची अंगठी आणावे यासाठी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. पैश्यांची पुर्तता न केल्याने सासू मंगला गुणवत रोटे, नंदोई कुरूजीत गणेश चौधरी, नणंद पल्लवी कुरूजीत चौधरी रा. जळगाव, नंदोई दिनेश काशीनाथ खडके आणि नणंद दिपाली दिनेश खडके दोन. रा. पुणे यांनी मानिसक त्रास दिला. हा प्रकार असहाय्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहन चौधरी करीत आहे. 

Protected Content