भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला लोखंडी पाईपने मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेल्वे मालधक्क्यावर सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला चार जणांकडून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, “शहरातील मोहन टॉकीजवळील दिनकर नगरातील संजय सुधाकर नेवरे (वय-२८) हा तरुण ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतो. तो दोन वर्षांपूर्वी मालधक्क्यावर सुपरवायझर म्हणून नोकरीला होता. शनिवारी १४ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथून योगेश व किरण सपकाळे यांना भेटून योगेश सरदार याच्यासोबत मालधक्क्याकडून गावात येत होते.

यावेळी रेल्वे धक्क्यावरील कोपर्‍यात काही हमाल व राजू पटेल, त्याचा मुलगा जास्मीन पटेल, मेहमुद पटेल व त्याचा साला यांचे भांडण सुरु होते. तेव्हा संजय नेवरे व किरण सपकाळे हे भांडण सोडवासोडव करण्यासाठी गेले असता, भांडण करणार्‍यांनी मारामारी करण्यासाठी आले असल्याचे समजून पटेल यांच्यासह त्यांच्यामुलांनी त्यांना शिवीगाळ करून जास्मीन पटेल याने नेवरे यांच्या पायाच्या पंजावर लोखंडी पाईपने मारीत त्यांना दुखापत केली. तसेच त्याला “तू कैसे जलगाव मैं रहता देखते” असे म्हणत त्याला धमकी देवून त्या ठिकाणाहून निघून गेले.

यावेळी नेवरे याला आमीन पठाण यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी रविवार, दि. १५ मे रोजी दुपारी त्यांच्या तक्रारीवरुन शहर पोलीसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content