मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक पाहिला ‘धर्मवीर’ हा सिनेमा

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून चर्चेत असलेला हा सिनेमा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सपत्नीक ‘धर्मवीर’ सिनेमा पाहिला आहे.

आयनॉक्स थिएटरमध्ये मुख्यमंत्र्यांसाठी खास शोचे आयोजन करण्यात आले होते. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाला प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा आज सपत्नीक पाहिला.

मुख्यमंत्र्यांसाठी खास आयोजन करण्यात आलेला हा शो पाहायला आयनॉक्समध्ये मुख्यमंत्र्यांसह त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि नगर विकासमंत्री तसेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.

 

Protected Content