रावेर येथे भारतीय वृक्ष दिनानिमित्त वृक्षारोपण

रावेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतीय वृक्ष दिनानिमित्त भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव व संलग्न शाखा रावेर तसेच निसर्ग जतन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रावेर येथील श्रीनाथ कॉलनी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

भारतीय वृक्ष दिनानिमित्त भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे ज्येष्ठ संचालक विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्षस्थानी निसर्ग जतन समितीचे संस्थापक वृक्षमित्र रमेश राठोड गुरुजी होते. विजय पवार सरांनी वृक्ष संगोपना संदर्भात उपस्थित पर्यावरणप्रेमींकडून प्रार्थना म्हणून घेतली. अध्यक्षीय भाषणात वृक्षमित्र रमेश राठोड यांनी वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास सांगून भारतीय प्रमुख वृक्षांची माहीती देत औषधी वनस्पतींची सखोल माहिती दिली. वृक्ष संगोपनाचे पालकत्व निलेश पाटील,शिक्षिक विजय पवार, सुनिल महाजन,मधुकर नेवे यांनी घेतली. उपस्थित भिशी सदस्यांतर्फे आंबा, नीम, सिताफळ यांचे परिसरात रोपण करण्यात आले. भिशीचे मार्गदर्शक निवृत्त शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड व पुस्तक भिशी संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे, रावेर पुस्तक भिशी समन्वयक कला शिक्षक अर्जून सोळुंके यांनी वृक्षारोपणाची प्रेरणा दिली. भिशी संचालक विजय पवार, रविंद्र बखाल,चौधरी सर,महेंद्र वंजारी,शिवरे सर, यांनी यशस्वितेसाठी अमूल्य सहकार्य केले.सुत्रसंचालन व आभार विजय पवार यांनी मानले.

Protected Content