राष्ट्रीय आपत्तीत रासेयोच्या स्वयंसेवकाचा मदतीसाठी हातभार – सौरव शाह

जळगाव प्रतिनिधी । देशावर कोणतीही राष्ट्रीय आपत्ती आली असेल तर राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक तात्काळ धावून जातो. आजही ही कोविड-१९ अर्थात कोरोना काळात संपूर्ण देशभर रासेयोचा स्वयंसेवक शासनाच्या विविध उपक्रमांना हातभार लावण्यासाठी सक्रीय आहेत. असे गौरवोद्गार राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक सौरव शाह यांनी काढले. कबचौउमवि विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रासेयो विभागीय कार्यालय,पूणे, रासेयो विभाग उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेबिनारच्या उद्घाटन प्रसंगी श्री शाह बोलत होते.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील, प्र-कुलगुरू पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ.अतुल साळुंके, पुणे गोवा राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय संचालक कार्तिकेयन, युवा अधिकारी अजय शिंदे, प्रभारी कुलसचिव डॉ .बी. व्ही. पवार, युनिसेफचे तानाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

दोन दिवस चालणाऱ्या ऑनलाईन वेबिनारच्या उदघाटन सत्रात राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका मांडताना आत्तापर्यंत स्वयंसेवकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याचा आढावा घेतला. सोबतच कोविड- १९ अर्थात कोरोना महामारी च्या काळात कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. राष्ट्रीय सेवा योजनेचे पुणे गोवा विभागीय संचालक कार्तिकेयन यांनीही राज्यातील विविध विद्यापीठांच्या कार्याचा आढावा घेतला व वेबिनार आयोजनाबाबत विद्यापीठाचे कौतुक केले. तर विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू डॉ. पी. पी .पाटील यांनी शुभेच्छा संदेश दिला. प्र-कुलगुरू माहुलीकर यांनी विद्यापीठाच्या वतीने या काळात राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केलेल्या कार्याचे कौतुक केले. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांनीही कोरोनाच्या काळामध्ये स्वयंसेवकांनी सामाजिक भान ठेवून ही जबाबदारी पार पाडली असे सांगितले.

वेबिनारच्या दुसऱ्या सत्रात युनिसेफच्या डॉ .राजलखमी नायर यांनी आरोग्याच्या बाबतीत महत्वाची जनजागृती करताना स्वयंसेवकांनी आणि समाजाने या काळात घ्यावयाची जबाबदारी व आरोग्याच्या समस्यांबाबत असलेल्या उपाययोजना संदर्भात भूमिका मांडली तर युनिसेफचे डॉ. शैलेश पाटील यांनी कुपोषण, आयुष्यमान भारत, बेटी बचाव बेटी पढाव, भारत सरकारच्या योजना यासंदर्भात युनिसेफच्या माध्यमातून चालणारे कार्य व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या कार्याबाबत माहिती दिली. भुवनेश्वर येथील डॉ. एन .बी.खुंतीया यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिर काळात काय खबरदारी घेतली पाहिजे, सनेटायझर आणि सोशल डिस्टन्स याबाबतीतले उपाय योजना यावर भाष्य केले. सत्राच्या शेवटी जळगाव येथील डॉ .सतीश पाटील यांनी कोरोना काळात समाजावर होणारे मानसिकदृष्ट्या परिणाम काय आणि कसे आहेत त्यासाठी मानसोपचार आणि समुपदेशन याबाबतीत भूमिका मांडली. वेबिनारच्या या संपूर्ण काळात राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य सचिव डॉ. प्रवीण महाले, डॉ.वैभव सबनीस, नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम, धुळे जिल्हा समन्वयक डॉ. वाल्मीक आढावे, जळगाव जिल्हा समन्वयक डॉ . विजय मांटे, जळगाव जिल्हा नोडल ऑफिसर डॉ. दिनेश पाटील, धुळे जिल्हा नोडल ऑफिसर डॉ .प्रशांत कसबे यांच्यासह तिनही जिल्ह्यातील विभागीय समन्वयक परिश्रम घेत आहेत़ .या राष्ट्रीय वेबिनार मध्ये देशभरातील विविध विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक, विविध पदाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक आणि समाजसेवेची आवड असणारे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Protected Content