आडगाव येथे ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ उपक्रम राबवण्याचा संकल्प

adgaon

यावल प्रतिनिधी । सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं तसेच श्रीक्षेत्र मनुदेवीच्या पायथ्याशी वसलेलं आडगाव गाव सलग तीन वर्षापासून पाणीटंचाईला सामोरे जात आहे वर्ष बदलतो आणि आस लागते ती पावसाची परंतु भयानक झालेली वृक्षतोड नाराज झालेला निसर्ग यावर काय करणार हाच प्रश्न लोकांच्या मनात उद्भवत होता. पण तरुणांनी एकत्र येऊन गावासाठी व परिसरासाठी संकल्प केला की, गावासाठी काहीतरी करावं कारण पाणीटंचाई फार मोठी समस्या झाली आहे. मग काय करावे त्यासाठी सर्व तरुण एक वाटला आणि गावासाठी ‘पाणी आडवा पाणी जिरवा’चा कार्यक्रम राबवू या असा संकल्प केला.

कार्यक्रम हा सर्वांना जमा करून माहिती देत तसेच व्हिडिओ आणि फोटो दाखवत सुरुवात केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आडगाव ग्रामस्थ होते. गुरुवर्य म्हणून मनुदेवी माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक बाळू पाटील हे होते. सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमाची माहिती सुरज रमेश पाटील यांनी दिली या कार्यक्रमाला आर्थिक दृष्ट्या सहकार्य लागले ते म्हणजे मनुदेवी संस्थान 1 लाख 51 हजार, तरुण तडफदार व्यक्तिमत्व म्हणजेच राजेंद्र पाटील यांनी 51 हजरांची मदत केली तसेच त्यांच्या पाठोपाठ गोकुळ पाटील यांनीही 11 हजारची मदत जाहीर केली. लोकांना जागृत करून त्यांच्याकडून आर्थिक मदत असो की श्रमदान करा अशी विनंती कार्यक्रमात करण्यात आली. कार्यक्रमाला शांताराम पाटील, नितीन पाटील, पुंडलिक पाटील, नामदेव कोळी, गणेश पाटील, अमोल पाटील, पवन शिंदे, कुणाल पाटील, भरत तायडे, योगेश पाटील, निलेश पाटील, समाधान पाटील, शिवाजी पाटील, किरण कोळी यांच्या मदतीने ग्रामस्थांना कार्यक्रमाचं महत्व पठवून दिले. कार्यक्रमासाठी लागणारे प्रोजेक्टरची मदत विश्वजीत पाटील यांनी केले.

Add Comment

Protected Content