संचारबंदी : दिव्यांगांना लॉक डाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा घरपोच द्या

जळगाव, प्रतिनिधी । दिव्यांग व्यक्तींना लॉक डाउनच्या काळात अत्यावश्यक सुविधा तत्काळ घरपोच देण्यात यावी अशी मागणी संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्थेतर्फे महिला व बालकल्याण, दिव्यांग विभाग अधीक्षक पांडुरंग पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. याकालावधीत दिव्यांग बांधवांना दररोज लागणारी सर्व शासकीय सुविधा व जीवनावश्यक वस्तूंचे किट आणि महापालीजकेच्या उत्पन्नानुसार ५ टक्के दिव्यांग निधी दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे यांच्या आदेशाने देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

फैजपुरात दिव्यांग सेनेतर्फे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

दिव्यांगांना जीवनाश्यक वस्तूंचे किट म्हणजेच अन्न , धान्य, कडधान्य, डाळी, तेल, गहू, तांदूळ, साखर, सॅनिटायझर, साबण, मास्क, रुमाल, डेटॉल, फिनेल आदी वस्तूंचे किट देण्यात यावे. स्थानिक प्रशासनाने त्यांच्या निधीतून गरजू दिव्यांग व्यक्तीला दोन वेळचे जेवण घरपोच देण्यात यावे. दिव्यांगांना दरमहा मिळणारे संजय गांधी निराधार योजनेचे तीन महिन्या करीत अतिरिक्त एक हजार मानधन त्वरित त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे आदी मागण्या संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्थेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतांना अध्यक्ष गणेश पाटील, किशोर नेवे, शाकीर खान, ज्ञानेश्वर इंगळे, जितू पाटील, प्रवीण भोई, राजेंद्र वाणी, शेख शकील, अक्षय महाजन, भरत जाधव, हरिराम तायडे, भीमराव म्हस्के, संगीता प्रजापत, आशा पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content