तरुण शेतकऱ्याचा महापालिकेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापुर वृत्तसंस्था । टीडी आर स्वरूपातील मोबदला मिळण्यात दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ कसबा बावडा शेतकऱ्याने कोल्हापूर महापालिकेच्या गेटवरच आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. मात्र सावधगिरी बाळगून महापालिका कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

आनंदा करपे असे या शेतकऱ्याच नाव आहे. टीडीआर स्वरूपातील मोबदला मिळवा यासंदर्भात त्यांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. मात्र त्याची दखल न घेतली गेल्याने कर्जबाजारी झाल्यामुळे आपल्याला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे सांगत आनंद करपे यांनी आज दुपारी महापालिकेत जात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

दरम्यान पोलिसांनी शेतकरी आनंदा करपे यांना ताब्यात घेतले आहे. याच दरम्यान महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होणार असल्याने विठ्ठल रामजी शिंदे चौकात नगरसेवक, कर्मचारी आणि इतर नागरिक होते. आत्मदहनाचा प्रयत्न होताच महापालिका परिसरात खळबळ उडाली आहे.

Protected Content