घुमावल बु॥ ग्राम पंचायतीतर्फे 506 वृक्षारोपण

506 अतनोींतवचंद

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील घुमावल बु || येथे दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. “संकल्प आमचा हरित ग्राम रस्ता’ या योजनेने मुख्य रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूस 506 झाडांची लागवड ‘झाड माझ्या प्रिय जनांचे’ या उद्देशाने लावण्यात आली. तसेच झाडांना संरक्षण जाळी व पाणी देण्याची व्यवस्था ही करण्यात आली.

या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी असून ते म्हणाले, तालुक्यातील हे पाहिले गाव असेल ते इतके झाडे लावण्याचा संकल्प करत असून गाव हे समृध्दीकडे वाटचाल करत आहेत. तसेच शैक्षणिक चळवळ, झाडे लावणे, स्वच्छता राखणे, शौचालय बांधणे, पाण्याची बचत करणे, अश्या विविध बाबींनी गाव समृद्ध होत असते. हे सर्व झाडे जगली तर चोपड्यातील हे सुंदर निर्सग पाहण्यासाठी लोक येथे येतील, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

यांची होती उपस्थिती

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन माजी आ. कैलास पाटील, समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, चोपडा.सा.का.चे माजी अध्यक्ष घनःशाम पाटील, कृ.उ.बा.स.चे.माजी अध्यक्ष सुरेश पाटील, नगर परिषदेचे गटनेते जिवन चौधरी,लिलावती हॉस्पीटल डॉ. जगदीश सरवैया, कृ.उ.बा.स.तिचे.माजी सभापती गिरीश पाटील, राजेंद्र माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक नंदलाल पाटील, शेतकरी संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, नवदुर्गा केला ऐजंन्सीचे वसंतराव पवार, तालुका कृषी अधिकारी चौधरी, कृ.उ.बा. चे.संचालक धनंजय पाटील, खडेगावचे जेष्ठ नागरिक बाळासाहेब पाटील, सूतगिरणीचे संचालक तुकाराम पाटील, भालेराव पाटील, धुपे. आदर्श शेतकरी रविंद्र निकम, गावचे पोलीस हिरामण पाटील, जेष्ठ नागरिक दत्तायत्र पाटील, भावलाल पाटील, युवराज पाटील, वसंत पाटील, माजी सरपंच शिवराम पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, सचिन पाटील,नकुल पाटील, तंटामुक्त अध्यक्ष संजय पाटील, ईश्वर पाटील, वि.का.सह.संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास पाटील, अमोल पाटील, निलेश पाटील, संतोष पाटील, गोकुळ पाटील, नवनित पाटील, भुषण पाटील, भुषण पाटील, किशोर पाटील, संजय पाटील, भोलेनाथ पाटील, ग्राम सदस्य नितीन पाटील, दिनेश पाटील, गावचे उपसरपंच प्रविण पाटील, आणि गावचे लोकनियुक्त सरपंच वसंतराव प्रेमराज पाटील, आणि जेष्ठ ग्रामस्थ युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Protected Content