गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन विविध कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आई जशी मुलांवर संस्कार करते तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे.गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ५ सप्टेंबर २०२३ रोजी  विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन उत्साहात साजरा केला.

 

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील व प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता) यांची उपस्थिती होती. त्यांच्यासोबत व्यासपीठावर महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख यांचे उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पूजन करून झाली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सर्व विभाग प्रमुख यांचे पुष्पगुच्छ आणि शुभेच्छापत्र देऊन स्वागत करण्यात आले.शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी पहिल्या सत्रामध्ये स्वतः शिक्षकांच्या भूमिकेत जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले. हे करत असताना विद्यार्थ्यांनी प्राचार्य तसेच विभाग प्रमुख यांच्याही भूमिका निभावल्या. अतिशय उत्साहात आणि तेवढ्याच शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांनी नियोजन केले होते.त्यानंतर दुसर्‍या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावीपणे शिक्षक दिनानिमित्त त्यांचे मत मांडले व शिक्षक दिनाचे महत्त्व त्या माध्यमातून समजावून सांगितले.

 

गणेश राज पाटील, सौरभ साळुंखे, डिंकी आणि खुशबू तसेच पूर्वेश बर्‍हाटे या विद्यार्थ्यांनी त्यांचे वकृत्व सादर केले. त्याचप्रमाणे अभिजीत पवार या विद्यार्थ्याने शिक्षकांवर आधारित एक कविता सादर केली.तसेच प्राचार्यांच्या भूमिकेत असलेली दिपाली खोडपे या विद्यार्थिनीने संपूर्ण दिवसाचा अनुभव कथन केला.तसेच गणेश राज आणि ग्रुप यांनी शिक्षक व विद्यार्थी यांच्या परस्पर संबंध वर एक लघु नाटिका सादर केली. या नाटिकेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी जिवापाड मेहनत घेऊन विद्यार्थ्याचे भविष्य घडविण्यासाठी नेहमी अग्रेसर असतो हा संदेश दिला. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकविले त्यातील उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

 

शिक्षक दिनाचे उत्कृष्ट शिक्षक खालील प्रमाणे

प्रथम वर्षसंध्या ब्राह्मणे व गणेश राज संगणक विभागविशाल बोंडे व अनस देशमुखइ अँड टीसी विभागवर्षा चौधरी व राज शिंपीयंत्र विभागकाजल विश्वकर्मा व सौरभ धांडेविद्युत विभागमोनाल पाटील व जयेश आंबेकर गोदावरी अभियांत्रिकी तर्फे साजरा करण्यात आलेल्या शिक्षक दिनानिमित्त सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल आपला आदर व्यक्त केला व भाषणामध्ये शिक्षक दिनाचे महत्त्व व शिक्षकांचे आपल्या जीवनातील स्थान याबद्दल सांगितले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी कार्यक्रमाच्या सुरेख आयोजनाबाबत विद्यार्थ्यांचे कौतुक केले, व शिक्षक दिनाचे महत्त्व सांगून शिक्षकाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. तसेच त्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या  जीवन प्रवासावर प्रकाश टाकला.विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांचे आचरण हे नेहमी शिस्तबद्ध असणे गरजेचे आहे तसेच शिक्षकांशी विद्यार्थ्यांचे संबंध आपुलकीचे असणे गरजेचे असते. शैक्षणिक कालावधीत असताना सर्व शिस्तीचे पालन केले तर भविष्यात दैदिप्यमान यश नक्कीच मिळते असेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे  सूत्रसंचालनअभिजीत पवार व स्नेहा वडनेरे या विद्यार्थ्यांनी केले. व आभार प्रदर्शन श्रुती सोनार या विद्यार्थिनीने केले.या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. आर व्ही पाटील, प्रा. निलेश चौधरी प्रा. हेमंत नेहेते, प्रा. अमित म्हसकर, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content