डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडियम सीबीएसई स्कूलचा ‘एकस्टेसी सागा २०२३’ स्नेहसंमेलन उत्साहात

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडियम सी.बी.एस.ई. स्कूलचे स्नेहसंमेलन ’एकस्टेसी सागा २०२३’ मोठया उत्साहात पार पडला. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन वरणगाव फॅक्टरीचे व्यवस्थापक पी.सी. नंदा, आकोला येथील मुख्य न्यायाधिश एस. जे. शर्मा यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने थाटात उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, भारती महाजन, प्रिन्सीपल सौ. अनघा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पी.सी. नंदा यांनी मार्गदर्शन करतांना स्नेहसंमेलनाच्या माध्यमातुन विद्यार्थीच्या कलागुणांना वाव मिळतो. स्पर्धेत सहभागी होणे हे अतिशय महत्वाचे असते. जिंकण्यासाठी अपार श्रम घ्यावे लागतात. डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, ही भुसावळ शहरातील नामवंत शाळा असुन आयुध निर्माणी वरणगांव येथील बरेच विद्यार्थी येथे शिक्षण घेत असुन बरेच विविध शासकीय पदांवर आज कार्यरत आहेत. शाळेचे कौतुक केले व गोदावरी फौंडेशन संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांनी भरभरून कौतुक केले.

न्यायाधीश यांनी छोटया छोटया गोष्टींचा संदर्भ देवुन विद्यार्थांना प्रोत्साहीत केले. आजचे युग स्पर्धा परीक्षेचे आहे. विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी असे सांगीतले. डॉ. उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन करतांना इ. १० च्या सी.बी.एस.ई परीक्षेत सर्व घवघवीत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देवुन त्यांना देशातील यशस्वी माणुस बनविण्याचे ध्येय या शाळेने घेतले असुन त्यासाठी सर्व प्रशासन नेहमीच प्रयत्नशील आहे. असे आश्वासन दिले.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य, नाटय, सादर करून आपल्यातील कलागुण सांस्कृतीक कार्यक्रमातुन सादर केले व सर्व उपस्थीतांचे मन मोहुन टाकले. मान्यवरांनी, पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मच्यार्‍यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन अंकीता जैन व कॅलेब यांनी केले.

Protected Content