डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.ए.पी.चौधरी शिक्षण संशोधन संचालक व डॉ. पी.आर.सपकाळे प्राचार्य कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव तसेच अध्यक्ष डॉ.शैलेश तायडे प्राचार्य, कृषी महाविद्यालय, जळगाव यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षक वृंद यांचा पुष्पगुच्छ व भेट वस्तु देवून सत्कार केला.

 

याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणुन विद्यार्थ्यांने सहभाग घेतला. यामध्ये विद्यार्थी मिनल कार्लेकर, माधुरी सपकाळे, रिया देशमुख, चैताली ठाकुर, श्रुती बारी, प्रणव घोंगरे यांनी शिक्षक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रा.बालाजी गोणशेटवाड व प्रा.अमोल सोहनी याने शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच अध्यक्षीय भाषणात डॉ. शैलेश तायडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये उंच उंच भरारी घ्या असे सांगुन यश संपादन करा असा संदेश शिक्षक दिनानिमित्त दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदेश गोरे या विद्यार्थ्याने तर आभार प्रदर्शन मोहित साळुंके या विद्यार्थ्यांने केले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सिध्देश जैन, युगुल ढाके, कल्पेश राणे आदेश गोरे, मोहित साळुंखे, कुणाल सपकाळे, महेश पाटील, उन्नती आहिरे, हर्षदा पावरा, पवन पाटील यांनी सहकार्य केले व प्रा.आर.डी.चौधरी क्रीडा अधिकारी व प्रा. करण बनसोडे रा.से.यो कार्यक्रम अधिकारी यानी मार्गदर्शन केले.

Protected Content