महिलेचा व्हिडीओ काढण्यावरून एकाला चोपले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी बँकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढणाऱ्या एकाला नागरीकांनी चांगला चोप देवून शहर पोलीसांच्या स्वाधीन केल्याची घटना बुधवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी ताब्यात असलेल्या संशयित आरोपीच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खासगी बँकेत महिला कर्मचारी नोकरीला आहे. बुधवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शौकत अली अब्दुल गफ्फार (वय-४२) रा. कासमवाडी, जळगाव हा तिथे आला. त्यावेळी महिला कर्मचाऱ्याशी बोलत असतांना  संभाषणाचे व्हिडीओ शुट‍ करत होता. दरम्यान, आपला व्हिडीओ शुट करत असल्याचे महिला कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच आरडाओरड करून बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना सांगितला. त्यानंतर घडलेल्या प्रकारनंतर संतप्त नागरीकांना त्याला चांगला चोप देवून शहर पोलीसांच्या स्वाधिन केले. यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात एकच गर्दी पहायला मिळाली. महिलेचे नातेवाईक देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content