अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दोन जणांना सुरत येथून अटक

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या संशयित आरोपी आणि त्याला सहकार्य करणाऱ्या मित्राला शहर पोलीसांनी सुरत येथून अटक केली आहे. याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील एका भागात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३१ ऑगस्ट रोजी तिला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी १ सप्टेंबर रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पिडीत मुलीला शुभम संजय मोरे रा. चाळीसगाव याने पिडीत मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत शुभम मोरे याचा मित्र राहुल जगन सुतार रा. सुरत याच्या मदतीने पिडीत मुलीला मोरे याने पळवून नेल्याचे समोर आले. त्यानुसार शहर पोलीसांनी राहूल सुतार याला ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखविताच त्यांने माहिती दिली. पिडीत मुलीला शुभम मोरे यांने सुरत येथे नेवून तिथे भाड्याच्या खोली राहण्यास सहकार्य केली. दरम्यान, पोलीसांनी सुरत येथून संशयित आरोपी शुभम मोरे आणि पिडीत मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्ह्यात पोक्सोचा कलम वाढविण्यात आला आहे.

 

यांनी केली कारवाई

अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहायक  पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे शोध पथकातील कर्मचारी नामे पोहेकॉ राहुल सोनवणे, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ रविंद्र वच्छे, पोकॉ उज्वल म्हरके यांनी करवाई केली आहे. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

 

पोलीसांचे आवाहन

अल्पवयीन मुलींच्या बाबत कोणतीही तक्रार असल्यास, पालकांनी न घाबरता तात्काळ पोलीस स्टेशन ला येवुन माहीती द्यावी. जेणेकरुन अश्याप्रकारचे गुन्ह्यांना तात्काळ पायबंद घालता येईल. तसेच युवकांमध्ये मोबाईलच्या सहाय्याने सोशल मिडीया वापराचे प्रमाण वाढलेले असुन पालकांनी वेळोवेळी आपल्या मुलांचे  मोबाईल चेक करुन मुलं हे कोणाच्या संपर्कात आहेत काय ? याबाबत चौकस राहून नेहमी सतर्क रहाण्याबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content