पारोळा तालुक्यात चोरीचा सत्र सुरूच; तात्काळ आळा घालण्याची आमदारांची मागणी

पारोळा प्रतिनिधी । पारोळा शहर व तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलीसांनी तत्काळ उपाययोजना करून चोरट्यांवर आळा घालवावा अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी पोलीस अधिक्षकांकडू मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चोरीचे सत्र सुरू आहे. सोने चोरी, वाहन चोरी, घरफोडी, रोख रक्कम चोरी इत्यादी प्रकारच्या धाडसी चोऱ्यांचे सत्र पारोळा तालुक्यात सुरु आहे. यात प्रामुख्याने वाहन चोरीचे सत्र रोजच सुरू आहेत. तसेच बसस्थानकात सोने व रोख रक्कम चोरीचे सत्रही सुरूच आहे. या सर्वच परिस्थितीमुळे पारोळा शहारासह तालुक्यातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण सर्वत्र पसरले आहे. परंतु स्थानिक पोलीस प्रशासन मात्र या सगळ्याच प्रकरणावर अगदी हलगर्जी भुमिका घेत आहे. तरी या चोरीच्या सत्रास त्वरीत आळा बसावा व स्थानिक प्रशासनास कठोर आदेश व्हावेत अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी विभागीय आयुक्त, नाशिक व जिल्ह्याचे पोलीस अधिकक्षक यांचेकडे केलेली आहे.

Protected Content