Home राजकीय धनंजय मुंडे यांच्याबद्दलचे सत्य पोलिसांनी तात्काळ समोर आणावे — फडणवीस

धनंजय मुंडे यांच्याबद्दलचे सत्य पोलिसांनी तात्काळ समोर आणावे — फडणवीस


 

मुंबई : वृत्तसंस्था । विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडे यांच्याबद्दलचे सत्य पोलिसांनी समोर आणलं पाहिजे असं म्हटलं आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपावरुन भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी भाजपा नेते करत आहेत.

“धनंजय मुंडे यांनी स्वत: आपल्या फेसबुक पोस्टमधून काही कबुली दिली आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भातील विचार करणं गरजेचं आहे. त्यातील कायदेशीर बाबींचा विचार केला पाहिजे. एक म्हणणं त्या मुलीचं आहे, एक म्हणणं धनंजय मुंडे याचं आहे. आपण कोर्टात गेल्याचं धनंजय मुंडे सांगत आहेत. असं संशयाचं वातावरण राहणं योग्य नाही. तात्काळ पोलिसांनी सत्य बाहेर आणलं पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही आरोप झाले. नंतर खुलासा झाला. यात काही अर्थ नसल्याचं निष्पन्न झालं. कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षला पोहोचणं योग्य नाही. मुंडे यांच्याबाबतही याबाबत‌ चौकशी होईल, खुलासा होईल. त्यांनी जो खुलासा केला तो समोर आहे,” असं जयंत पाटील म्हणाले आहेत.


Protected Content

Play sound