सावद्याचे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र बेंडाळे अपघातात जखमी

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | मागून आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत येथील माजी उपनगराध्यक्ष रवींद्र बेंडाळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, सावदा येथील माजी उपनगराध्यक्ष रवींद्र बेंडाळे हे कोचूर शिवारातील आपल्या शेतात जात होते. दरम्यान, कोचूर रस्त्यावरील हॉटेल आराध्याच्या जवळ बाजूच्या शेतातून ते मुख्य रस्त्यावर जात होते. इतक्यात मागील बाजूस आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

रवींद्र बेंडाळे यांना उपचारासाठी जळगाव येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच सावदा येथील त्यांचे आप्त आणि मित्रमंडळीने घटनास्थळी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Protected Content