देशातील कोरोनामुक्तीचा दर 91 टक्क्यांवर

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील कोरोनाचा संसर्ग हा बऱ्यापैकी आटोक्यात येत असल्याचे दिसत असून यातील लक्षणीय बाब म्हणजे कोरोना मुक्ती दर हा तब्बल 91 टक्क्यांच्या पार गेल्याचे दिसून येत आहे.

देशभरातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट आल्याचे आता दिसून येत आहे. यासोबत सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आता कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या देखील लक्षणीय प्रमाणात वाढीस लागलेली आहे. काल सायंकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना मुक्तीचा दर हा तब्बल 91.15 टक्के असल्याचे दिसून आले आहे. तज्ञांनी येत्या काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट येणार असल्याचा इशारा दिलेला आहे. तथापि या आधी शासकीय उपाययोजनांमुळे आता कोरोनाचा संसर्ग हा थोड्याफार प्रमाणात आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. तरी आरोग्य मंत्रालयाने जोवर यावरील लस येत नाही तोवर याबाबत नागरिकांनी निश्चिंत राहू नये असा इशारा दिला आहे.

Protected Content