रब्बी हंगामातील पिकांसाठी 31 डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । रब्बी हंगामातील पिकांसाठी उपसा सिंचन योजनेंतर्गत पाण्याचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जळगाव पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रातील जिल्ह्यातील हतनूर मोठा प्रकल्पावरील जलाशय, हतनूर कालवा, तापी नदी, सुकी, अभोरा, अग्नावती, तोंडापूर, हिवरा, मोर, मंगरुळ व बहुळा या मध्यम प्रकल्पावरील त्याचप्रमाणे गाळण, बदरखा, गारखेडा, सार्वखाजोळा, बाबंरुड, वाकडी, लोहारा, गहुला, पिंपळगाव हरेश्वर, कोल्हे, सातगाव, सार्वपिंप्री, कळमसरा, गोदेंगाव, चिलगांव, पिंपळगाव, वाकोद, बिलवाडी, गोडखेल-1, शेवगा, मोहाडी, माळपिंप्री, पिंप्री, गोद्री, हिवरखेडा, वेल्हाळे या लघु प्रकल्पावरील कालव्याच्या वितरिकेवर प्रवाही, जलाशय नदी नाले व कालव्यावर उपसा सिंचनाने पाण्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभधारकांना यंदाच्या रब्बी हंगामातील रब्बी हंगामातील गहु, दादर, हरबरा, अन्यधान्य, चाऱ्याची पिके या पिकांसाठी  15 ऑक्टोबर, 2021 ते 28 फेबुवारी, 2022 या मुदतीकरीता अटींचे अधीन राहून सिंचनास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इच्छूक लाभार्थ्यांनी ३१ डिसेंबर पर्यंत आपल्या भागातील शाखा कार्यालयातील शाखाधिकारी यांच्याकडे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा पोष्टाने जमा करण्यात यावे, पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत 31 डिसेंबर, 2021 नंतर वाढविली जाणार नाही, अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी बुधवार १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content