Home धर्म-समाज आमदार किशोर पाटील साधणार फेसबुक लाईव्हद्वारे संवाद

आमदार किशोर पाटील साधणार फेसबुक लाईव्हद्वारे संवाद

0
62

पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा – भडगाव मतदार संघातील सततच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत आ. किशोर पाटील हे आज फेसबुकच्या माध्यमातून संध्याकाळी पाच वाजता थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणार आहेत.

 

सततच्या पावसाने पाचोरा – भडगाव मतदार संघातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पुर्णत: पाण्यात बुडाला आहे. शेतीची झालेली दैना पाहून खुप वाईट वाटते. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, ही वास्तवता आहे. लोकप्रतिधी म्हणुन  आमदार किशोर पाटील तातडीने प्रशासनाची बैठक घेऊन नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. प्रत्यक्ष पंचनाम्याना सुरवात ही झाली आहे. अशा परीस्थीतीत ‘माझ्या बळीराजाशी संवाद साधुन त्यांच्याशी बोलले पाहीजे, त्यांचे ऐकून घेतले पाहीजे’. त्यांना धीर दिला पाहीजे या भावनेतुन आमदार किशोर पाटील हे आज दि‌. ३ रविवारी सायंकाळी ५ वाजता पाचोरा – भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. तरी तमाम शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या फेसबुक लिंकवर जाऊन सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना, युवासेना पाचोरा – भडगाव यांचे तर्फे करण्यात आले आहे.

 

वेळ-सायंकाळी पाच वाजता

https://www.facebook.com/KishorAppaPatilMLA/

 


Protected Content

Play sound