Home Cities बोदवड बोदवड तालुका मुख्याध्यापक संघातर्फे जे. के. पाटील यांचा सत्कार

बोदवड तालुका मुख्याध्यापक संघातर्फे जे. के. पाटील यांचा सत्कार


बोदवड प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या अध्यक्षपदी जे. के. पाटील यांची निवड झाल्याबद्दल बोदवड येथील रांका विद्यालयात तालुका मुख्याध्यापक संघातर्फे सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानी रांका विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. ए. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ सदस्य जी. आर. चौधरी, रावेरचे अध्यक्ष ललित चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी जी.आर. चौधरी, ललित चौधरी यांचाही सत्कार करण्यात आला.

बोदवड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष यु एम वराडे यांनी प्रास्ताविक केले. जे के पाटील सर.  व जी आर चौधरी  सर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापक पी एम पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले. एणगांव जी डी हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री पुरुषोत्तम गड्डम सर यांनी डॉक्टरेट पदवी मिळविल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्यजित नेमाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.टी. बडगुजर, जामठी विद्यालयाचे मुख्याध्यापक के.आर. पाटील, शेलवड विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी. इंगळे, हरणखेड विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.एल. पाटील, नाडगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक लांजुळकर यांची उपस्थिती होती. सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन रेणुका माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एस. धनगर यांनी केले.


Protected Content

Play sound