जिल्ह्यात तीन कोरोना बाधीत; जळगावचे दोघे तर अमळनेरचा एक रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज सायंकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये तीन रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून यात जळगावचे दोन तर अमळनेरच्या एका रूग्णाचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधितांचे ताजे स्टेटस जाहीर केले आहे. यानुसार-जिल्ह्यातील अमळनेर, पाचोरा, जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 48 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 45 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून तीन व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये अमळनेर येथील एक, जळगावातील दोन रूग्णांचा समावेश आहे. तसेच कोरोना बाधित रूग्णांपैकी आज अमळनेरच्या एक व भुसावळ येथील एक रूग्णाचा मृत्यू झाला आहे. निगेटिव्ह आढळलेले सर्व तपासणी अहवाल पाचोरा येथील आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 160 इतकी झाली असून त्यापैकी वीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content