भाजपा आमदारांकडून कर्नाटक विधानसभेतच रात्रीचे जेवण आणि मुक्काम

Karnataka 1

 

बेंगळुरू (वृत्तसंस्था) गुरुवारी कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. मात्र यावरुन विधानसभेत गोंधळ झाल्याने कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आले होते. परंतू विश्वासदर्शक ठरावावर मतदान होत नाही. तोपर्यंत भाजप आमदारांनी विधानसभेतच ठिय्या दिला आहे. अगदी रात्रीचे जेवण तर मुक्कामही विधानसभेतच केले आहे.

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत राज्यपालांनी दिली आहे. गुरुवारी संध्याकाळनंतर कर्नाटक विधानसभेत भाजपाचे आमदार चादरी आणि उशा घेऊन दाखल झाले. तिथेच त्यांनी जेवणही केले आणि मुक्कामही केला. भाजपाचे आमदार चादरी आणि उशा घेऊन विधानसभेत पोहचले होते. दरम्यान, गुरुवारी काँग्रेस आणि जेडीएसचे १५ बंडखोर आमदार अनुपस्थित होते.

Protected Content