पुण्यात डेंग्यूचे 188 संशयित रुग्ण; 19 जणांना डेंग्यूची लागण

dengue1

पुणे प्रतिनिधी । जुलै माहिन्याचा गेल्या पंधरादिवसात डेंग्युचे 188 संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यामध्ये 19 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर, मुंढवा, घोले रस्ता व भवानी पेठ परिसरात डेंग्युच्या रूग्णांची संख्या वाढलेली आहे. यावर्षी पावसाळा सुरू होण्यास जूनचा शेवटचा आठवडा उजाडला. मात्र महिन्याच्या आरंभापासून डेंग्यूच्या तापाच्या संसर्गात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास सुरूवात झाली. जून महिन्यात डेंग्यूच्या १६८ संशयित रूग्णांपैकी ३२ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. जुलै मध्ये पंधरवड्यातच १८८ डेंग्यूचे संशयित रूग्ण आढळले आहेत. तर मागील आठवड्यात ८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.  स्वच्छ पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. तिथेच त्यांची वाढ होते. याबाबत जनजागृती करूनही इमारती, सोसायट्या, बंगले याठिकाणी डेंग्यूची पैदास होत असल्याचे दिसत आहे. मात्र पुणेकरांकडून अद्यापही गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळेच डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. घरात पाणी साठवून ठेवणे किंवा झाडांच्या कुंड्यामध्ये अथवा अडगळीच्या भागात पाणी साचणे ही डासाच्या व्युत्पत्तीची ठिकाण आहेत हे नागरिकांनी लक्षात ठेवावे असे आवाहन महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी केले आहे.

Protected Content