जळगावात बंदला संमिश्र प्रतिसाद (व्हिडीओ)

bhahuja

जळगाव, प्रतिनिधी | नागरिकत्त्व सुधारणा कायदा, एनआरसी व खासगीकरणाचा विरोध म्हणून वंचित बहुजन आघाडीतर्फे केलेल्या बंदला शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. पंडित जवाहरलाल नेहरू पुतळा येथून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने बंद मागे घेण्यात आला.

विभागीय पोलीस अधिकारी नीलभ रोहन यांनी आंदोलक फुले मार्केटजवळ पोहचल्यावर आंदोलकांना परवानगी काढली आहे का ? अशी विचारणा केली. यावेळी आंदोलकांनी आम्ही शांततेच्या मार्गाने दुकानदारांना बंद करण्याचे आवाहन करत असल्याचे सांगितले. यावेळी रोहन यांनी आंदोलकांना कायद्याची बाजू समजून सांगितल्याने बंद मागे घेतला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी बोलतांना सांगितले. ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा लिहिला आहे. त्या कायद्याचा मान सन्मान राखण्यासाठी बंद मागे घेतला.

यांनी घेतला सहभाग
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सुमित सोनवणे, जळगाव युवक महानगर अध्यक्ष जितेंद्र केदार, जिल्हा उपाध्यक्ष डिगंबर सोनवणे, राष्ट्रीय दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष राजू महाले, जळगाव विधानसभेचे उमेदवार शेख शफी मेजर, महिला आघाडी जिल्हा महासचिव फिरोजा शेख, राहुल सुरवाडे, मनोज वानखेडे, जळगाव तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवे, महानगर संघटक खंडू महाले, आदींनी जळगाव बंदमध्ये सहभाग नोंदवला होता.

Protected Content