स्वातंत्र संग्रामातील “ब्रिटिशांच्या खबऱ्यांनी आम्हाला वारसा शिकवू नये ; गेहलोत यांचा मोदींना टोला

gehlot modi

जयपूर (वृत्तसंस्था) पंडीत नेहरुंचा वारसा हा बलिदानाचा आहे. ते देशासाठी तुरुंगात जाण्याचा त्यांचा वारसा आहे. देशाचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी देशासाठी शहीद झाले. हा काँग्रेसचा खरा वारसा आहे. तुमच्या पक्षाची विचारसरणी असणारे लोक हे स्वातंत्र संग्रामामाध्ये ब्रिटीशांचे खबरी होते. ते ब्रिटीशांसाठी खबऱ्याचे काम करायचे. आता हे असे लोक काँग्रेसच्या वारसाबद्दल बोलणार. खरोखर हे लज्जास्पद आहे,” असा टोला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान  मोदींना लगावला आहे.

 

जयपूरमधील एका कार्यक्रमामधील भाषणात गेहलोत यांनी भाजपाच्या धोरणांचा समाचार घेतला. काँग्रेसच्या १३५ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये गेहलोत यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी, न्यायसंस्था, निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी आणि आयकर विभागासारख्या संस्थांवर केंद्र सरकारचा दबाव टाकू पाहत आहे. पंतप्रधान कार्यालयाला विश्वासात ठेऊनच हे सर्व निर्णय घेतले जातात. सर्व निर्णय पंतप्रधान कार्यालयातच घेतले जातात. देशाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे हे समजत नाही,” अशा शब्दांमध्ये गेहलोत यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. एकीकडे काँग्रेसला मोठा वारसा आहे जो आपण अभिमानाने सांगू शकतो. संपूर्ण देशाला याचा अभिमान आहे. अशा वारसाबद्दल पंतप्रधान मोदी काय बोलतात सर्वांना ठाऊक आहेच. पंडीत नेहरुंच्या वारसाबद्दलही ते काय बोलतात हे ही तुम्हाला ठाऊक आहे,असेही गेहलोत म्हणाले.

Protected Content