पारोळा येथे अश्वारूढ शिवस्मारकाची मागणी; आ.चिमणराव पाटलांचे अश्वासन

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पारोळा येथील छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक (शिवतीर्थ) ह्या ठिकाणी अश्वारुढ शिवस्मारक व्हावे, ह्या मागणीसाठी आमदार कार्यालय येथे अश्वारुढ शिवस्मारक मागणीचा अर्ज घेऊन शिव प्रेमी ८०-९० तरूण दाखल झाले होते. त्यावेळी आ. चिमणराव पाटील व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी अश्वारूढ शिवस्मारक बसविण्यासाठी मंत्रमंडळाकडे पाठपूरावा करणार असल्याचे अश्वासन दिली.

यावेळी निवेदन देताना रवि भाऊ मराठे, राजेंद्र कासार, समाधान धनगर, नितिन बारी, भैय्या चौधरी, ज्ञानेश्र्वर मराठे, निलेश मराठे, मनोज चौधरी ,अनिल पाटील,आकाश ठाकुर, कल्पेश मराठे, राजु गढरी विजय चौधरी श्रीराम भोई, जयेश भोई, अक्षय पाटील, सौरव पाटील, दिपक भोई, ललित लोहार, योगराज लोहार, विशाल मेटकर, रोहन कासार, अमोल ठाकुर, राज चौधरी, सोनु भोई, नरेंद्र कायस्थ सह सर्व युवा शिवप्रेमी उपस्थित होते.

Protected Content