भुसावळ (प्रतिनिधी) शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवून आमदार संजय सावकारे यांनी भुसावळ शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नुकतीच रोपं भेट दिली. एवढेच नव्हे तर, वृक्षसंवर्धनाच्या दृष्टीने आ. सावकारे यांच्यातर्फे ‘सेल्फी विथ माय लाईफ’ ही स्पर्धा घोषित करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, शासनातर्फे प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 2 वृक्ष लागवडीचे आदेश देण्यात आले आहे. त्या अंतर्गत सेविकांनी रोप मिळवण्यासाठी प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा रजनी सावकारे यांच्याशी संपर्क साधत रोपे मिळवून देण्यासाठी विंनती केली. याची त्वरित दखल घेत आ.संजय सावकारे यांनी त्यांना रोपे उपलब्ध करून दिली. अंगणवाडी सेविका कर्तव्यदक्ष असून त्यांची कामे अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात. वृक्षारोपणच्या या मोहिमेत सुद्धा त्या सक्रिय सहभागी होत आपले कर्तव्य पार पाडतील, हा विश्वास आ.सावकारे यांनी व्यक्त केला.
भुसावळ येथील श्रध्दानगर येथे गणपती मंदिरा जवळ आ. सावकारे यांच्या हस्ते नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांच्या संवर्धनाची जवाबदारी तेथील रहिवाशी अशोकजी अट्रावल व त्यांच्या कुटूंबियांनी घेतली आहे. आमदार सावकारे यांच्यातर्फे से’ल्फी विथ माय लाईफ’ ही स्पर्धा घोषित करण्यात आली. त्या अंतर्गत चांगले वृक्षसंवर्धन करण्याऱ्या सेविकांना आ.सावकारे यांच्यातर्फे बक्षीस देण्यात येणार आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) भुसावळचे आर. एम. सिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट क्र.2 च्या पर्यवेक्षिका वैशाली सावदेकर यांनी मागील वर्षी 350 वृक्षारोपण केली होती. यंदा देखील त्या 500 झाडे लावून जगवण्याची ग्वाही उपस्थित सर्व सेविका मदतनीसातर्फे दिली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अंगणवाडी सेविका मनीषा नेवे यांनी केले. तर जया पाटील (सेविका) यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठा महिला मंडळच्या अध्यक्ष रजनी सावकारे, सदस्य अनिता आंबेकर, अर्चना सोनवणे, अंगणवाडी सेविका अश्विनी पाटील, संगिता कोळी, पुष्पा राणे, अशहर बानो, जरीना तडवी, शकुंतला सावकारे, संगिता निंभोरे, वैशाली निंभोरे , रजनी नेमाडे यांनी परिश्रम धेतले. पर्यवेक्षिका वैशाली सावदेकर यांनी आ. संजय सावकारे व रजनीताई सावकारे यांनी वृक्षारोपण साठी रोपं उपलब्ध करून देत कार्यक्रमालाही उपस्थित राहिल्या.