खासदार पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष पवार यांचा कोरोना योद्धा सन्मान देवून गौरव

पारोळा, प्रतिनिधी । कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात दूरवर अडकलेल्या नागरिकांना घरी आणण्यासाठी प्रयत्न करणारे तसेच पारोळावासियांकरिता आरोग्याच्या सेवा सुविधा करिता मेहनत घेणारे विशेषत सर्वच व्यापारी बांधवांचे खंबीर आधारस्तंभाची भूमिका घेणारे खासदार उन्मेष पाटील आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांचा पारोळा व्यापारी महासंघाच्या वतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.

शहरातील अमृत कलेक्शन येथे सर्वच व्यापारी बांधवांनी दिवसभराचा व्यवसाय आटोपून हा छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित केला होता. अमृत कलेक्शनचे संचालक तसेच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील यांनी पारोळा व्यापारी महासंघाचे आभार व्यक्त करत आपल्यातील बंधुभाव एकता कायम ठेवत महासंघानी वाटचाल करावी माझ्या शुभेच्छा आपल्या पाठीशी राहतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांनी सांगितले की, सर्वच व्यापारी बांधवांचे पालिकेला सहकार्य असून सुरू असलेल्या विकासकामांना उजाळा देत आभार व्यक्त केले. याप्रसंगी ज्येष्ठ व्यापारी संजय कासार,विलास वाणी, कैलास हिंदुजा, अशोक लाल शेठ, आकाश महाजन, सुनील भालेराव, प्रतीक मराठे, दिनेश गुजराथी, महेश सिधी, संजय पाटील, रोशन शहा आदी उपस्थित होते. प्रास्तविक संजय कासार यांनी केले.

Protected Content