मंदिरे सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन- डॉ. गुरूमुख जगवाणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । राज्यात २३ मार्चपासून सर्व मंदीरे बंद ठेवण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे याकडे साफदुर्लक्ष होत असल्याचे राज्यभरात भाजपातर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरातील भाजपा आध्यात्मिक समन्वय समितीतर्फे गोलाणी मार्केटमधील हनुमान मंदीरासमोर माजी आमदार गुरूमुख जगवाणी यांच्या उपस्थितीत घंटानाद करण्यात आला. सरकारने मंदिरे सुरू न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.पहा डॉ. जगवाणी नेमके काय म्हणालेत ते ?

दरम्यान, भाजपच्या आजच्या घंटानाद आंदोलनास राज्यभरात चांगला प्रतिसाद लाभला असून सिंधी समाजाने याला पूर्ण पाठींबा दिल्याचे माजी आमदार तथा भाजपच्या आध्यात्मिक समन्वय समितीचे सदस्य डॉ. गुरूमुख जगवाणी यांनी दिली.

1. भाजपा आध्यात्मिक समन्वय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर आज केलेल्या घंटानाद आंदोलनाबद्दल काय सांगाल?
भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय समितीच्या सदस्यपदी निवड केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे आभार मानले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदीरे २३ मार्चपासून बंद ठेवण्यात आली आहे. राज्यात मोठ्याप्रमाणावर मंदीरे बंद पडली आहे. हिंदू समाजाचे अनेक सण आगामी काळात येत आहे. कोरोनामुळे भक्तांना मंदीरात जाता येत नाही. यात गणेशोत्सव सुरू आहे तर कार्तिक महिना, नवरात्री आणि दसरा हे सण आहेत. याकडे राज्यात महाविकास आघाडीचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. यासाठी संपुर्ण राज्यात घंटानाद भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक समन्वयक आघाडीतर्फे जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. समाजाच्या नात्याने केलेल्या गुरूमुख जगवानी यांनी केलेल्या आवाहनाला उल्हास नगर, आकोला, धुळे, जळगाव येथील सिंधी समाजाचे बांधवांनी घंटानाद आंदोलनाला प्रतिसाद देत पाठिंबा दिला व घंटानाद आंदोलनात सहभागी झाले.

2. आंदोलनानंतर मागणी पुर्ण न झाल्यास पुढची दिशा काय असेल?
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे एक हिंदूत्ववादी आहे. त्यामुळे मंदीरे उघडणे किती गरजेचे आहे हे समजू शकतात. आज भाजपाच्या आध्यात्मिक समन्वयक आघाडीच्या वतीने केलेल्या आंदोलनामुळे ठाकरे सरकारला जाग येईल आणि मंदीरे सुरू करणे किती गरजेचे आहे हे समजले. आम्ही केलेल्या मागणीला महाविकास आघाडीने प्रतिसाद न मिळाल्यास भाजपाच्या सर्व आघाडीची बैठक घेवून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल.

पहा डॉ. जगवाणी नेमके काय म्हणालेत ते ? (व्हिडीओ )

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/232881488044540

Protected Content