भिक्षुकांना बेदम मारहाण ; नाथ-गोसावी समाजाचे तहसीलदारांना निवेदन

40033a11 07da 4cef b442 54fade6e0ed2

जामनेर (प्रतिनिधी) गैरसमजातून १२ जुलै रोजी तिड्या-मोहमाडी तालुका रावेर या गावात नाथ-गोसावीसमाजाच्या दोघा भिक्षुकांना बेदम मारहाण करण्यात येऊन त्यांना काही काळ डांबुन ठेवण्यात आले होते. या घटनेच्या निषेधार्थ तहसिलदार व पोलीस निरीक्षकांना यांच्याकडे समाज बांधवांनी विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच सादर केले.

 

या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या १२ जुलै रोजी रावेर तालुयाक्यातील तीड्या-मोहमाडी गावात जामनेर तालुक्यातील रहीवाशी नाथ-गोसावी समाजाचे दोन भिक्षुक नामे विश्ववनाथ बाबुनाथ चव्हाण व साजन प्रेमनाथ चव्हाण यांना बेदम मारहाण करून डांबून ठेऊन घटनेची क्लीप बनवीत व्हाटसअपवर व्हायरल करण्यात आली. मात्र, या वेळी स्थानीक पोलीस ठाण्याचे प्रभारी राहुल वाघ यांनी धाव घेतली. त्यामुळे दोघं भिक्षुकांचे प्राण वाचले होते. यानिनिमित्ताने राईनपाडा जिल्हा धुळे येथील घटनेची पुनरावृत्ती सुदैवाने टळली आहे. परंतू आमचा समाज भयभित झाला आहे.

 

(१७) बुधवार रोजी नाथ-गोसावी समाजबांधव शहरात जमा झाले होते. त्यावेळी उपस्थितांसमोर पदाधिकाऱ्यांनी आपापली मनोगत व्यक्त केले. तहसिलदार व पोलीस निरीक्षकांना आपल्या या संदर्भातील विवीध मागण्यांचे लेखी निवेदनही सादर केले. वरील घटनेेचा निवेेदनाद्वारेही निषेध करण्यात आला असुन अमाणुुषपणे अन्याय करून सोशल मिडीयावर बदनााम केले,अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशीही मागणी समाजबांधवांतर्फे करण्यात आली.

 

निवेदन देतेवेळी ज्ञानेश्वर शिंदे, मच्छींद्र शिंदे, विश्वनाथ चव्हाण, राजाराम शितोळे, रमेश चव्हाण,काशिनाथ चव्हाण, रघुनाथ चव्हाण, बापुनाथ चव्हाण,विठ्ठल पवार, भगवान शिंदे, डिगबर चव्हाण, ईश्वर चव्हाण, भरत शिंदेे, किसन चव्हाण, शिवाजी शिंदे, विठोबा सुरूपे, गोरख चव्हाण, अर्जुन शिंदे, माणीक शिंदे, साजन चव्हाण, मोहन सुरवाडे, नारायण चव्हाण, भगवन सुरुपे आदी समाज बांधव मोठ्या संख्येेने होते.

Protected Content