रेल्वेच्या कामास सुरूवात मात्र मोहाडीसह परिसरातील शेतकऱ्यांची मोबदल्यासाठी वणवण

जळगाव प्रतिनिधी । जळगाव-शिरसोली दरम्यान रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या मार्गाचे काम पुर्ण झाले आहे. त्यासाठी मोहाडी, धानोरा व नागझीरी येथील २५ शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र काम पुर्ण झाले तरी शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. शेतकऱ्यांची मोबदल्यासाठी वणवण अजूनही सुरूच आहे.

जुना वहिवाट रस्ताही बंद -रेल्वे मार्गाचे काम सुरू असतांना शेतकऱ्यांचा वापर असलेला जुना वहिवाटीचा पूर्वापार रस्ताही बंद करण्यात आला. यामुळे २५ ते ३० गटांचा रस्ता बंद झाल्याने या शिवारातील अनेक शेतकऱ्यांना दीड किलोमीटर रस्त्यासाठी सहा किलोमीटर एवढ्या फेऱ्याने जावे लागत आहे. याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितले असता. रस्ता करून देतो असे वेळोवेळी सांगण्यात आले. मात्र त्यांच्या अधिकाऱ्यांना विसर पडला आहे. शेतकरी आता त्रस्त झाले असून मध्य रेल्वेचे उपमुख्यअभियंता व जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी तक्रार दाखल केली आहे. तसेच जळगाव तहसीलदार यांनी २६ जून रोजी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी देखील केली आहे. प्रशासनाला कधी जाग येईल व समस्या कधी सुटतील असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे

Protected Content