यावल येथील ९५ मंडळातर्फे श्रीगणेशाची स्थापना

यावल प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार यावल शहर व ग्रामीण क्षेत्र मिळून ९५ सार्वजनिक मंडळातर्फे साद्या पद्धतीने श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली.

दरम्यान, श्रीगणेशच्या मंडळाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली नसल्याचे पोलिसांनी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले , मागील वर्षीप्रमाणे यंदा ही कोरोनाच्या सावटात कोणतीही मिरवणुक न काढता यावल शहरात एकुण २४व एक खाजगी तसेच ग्रामीण परिसरात ७१ अशा ९५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या उत्सवात सहभाग घेतले आहे .यावल पोलीस पोलीस स्टेशनच्या

शहरासह परिसरात पाच दिवसीय गणेशोत्सव शहरात पाच दिवशीय गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यावल शहरात २४ सार्वजनिक तर एक खाजगी अशा २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रात्री उशिरापर्यंत श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली आहे.

यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार स्थापना करावयाची असल्याने कोणत्याही मंडळाने मिरवणुकी काढल्या नाहीत ग्रामीण परिसरात 74 गणेशोत्सव मंडळ हा उत्सव साजरा करत आहेत शहरात पाच दिवसीय उत्सव असल्याने एक दिवस स्थापने मध्ये तर एक दिवस विसर्जनात जात असल्याने तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने आरास पाहण्यासाठी भाविकांची फारशी गर्दी नसते त्यामुळे नवरात्री उत्सवाच्या तुलनेत  गणेशोत्सवात युवावर्गात फारसा उत्साह दिसत नाही.

उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन

गणेश स्थापनेसह सह विसर्जन उत्सव शांततेत पार पडावा यासाठी येथील महसूल व पोलिस विभागाच्या वतीने अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, अधिकारी कैलास कडलग यांनी गणेश मंडळांसह शांतता समिती कार्यकर्त्यांच्या बैठकीत कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर सर्व सार्वजनिक श्रीगणेश मंडळाच्या कार्यकर्तांनी  शासनच्या नियमांचे काटेकोर पालन करीत उत्साहात  व शांततेत पार पाडण्याचे आवाहन यावेळी सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्तांना करण्यात आले

Protected Content