मेहरूण तलावावर विनाकारण फिरणाऱ्या नऊ जणांवर दंडात्मक कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरुण तलावावर दुचाकी तसेच चारचाकी वाहने घेवून फिरण्यास बंदी आहे. असे असतांनाही मेहरुण तलावावर वाहने घेवून फिरणार्या ९ जणांवर आज रविवारी सकाळी एमआयडीसी पोलीस तसेच शहर वाहतूक शाखेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली

याबाबत माहिती अशी की, टवाळखोरांच्या उपद्रवामुळे मेहरुण तलावाचा जॉगिंग ट्रॅक हा केवळ पादचार्यासाठी खुला करण्यात आला आहे या ट्रॅकवर वाहने घेवून जाण्यास पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार बंदी करण्यात आली तसेच बॅरीकेटसही लावण्यात आले आहे रविवारी सकाळी पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी मेहरुण तलाव परिसरास भेट दिली असता, बंदी असतांनाही ट्रॅकवर काही नागरिक दुचाकी तसेच वाहने घेवून फिरतांना दिसून आले यानंतर अधीक्षकांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांना कारवाईच्या सुचना केल्या त्यानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल विश्वजीत सोनवणे व गोविंदा पाटील तसेच शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार प्रकाश किरतसिंग परदेशी, पोहेकॉ/विजय सुकलाल जोशी यांनी मेहरुण तलावावर धडक मोहिम राबविली यावेळी वाहने घेवून फिरणार्या ९ जणांवर कारवाई करण्यात येवून ३३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Protected Content